सारा तेंडूलकरची ‘या’ भारतीय क्रिकेटपटूसोबत अफेअरची चर्चा, जाणून घ्या कोण-कोणत्या क्रिकेटपटूंबद्दल रंगल ‘गॉसिप’

मुंबई : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटपटूंची लाईफ स्टाईल आणि त्यांच्या अफेअर्सची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक क्रिकेट प्रेमी उत्सुक असतो. 2020 मध्ये कोरोनाममुळे मैदानावर क्रिकेटचा थरार जास्त पहायला मिळाला नाही. असे असले तरी क्रिकेटपटूंच्या अफेअरची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगली रंगली. यामध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरची मुलगी सारा हिच्यासोबत देखील एका क्रिकेटपटूचे नाव जोडण्यात आल्याची चर्चा रंगली. जाणून घेऊयात 2020 मध्ये कोणकोणत्या क्रिकेटपटूच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या.

पृथ्वी शॉ – प्राची सिंग

मागील अनेक महिन्यांपासून पृथ्वी शॉ आणि प्राची सिंग यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसल्या. पृथ्वी शॉच्या प्रत्येक फोटोवर प्राची सातत्याने कंमेंट करताना दिसली. IPL मधील पृथ्वी शॉच्या चांगल्या खेळीचा स्क्रीनशॉट तिने आपल्या इन्स्टा वर पोस्ट केला होता. तसेच पृथ्वी शॉ देखील तिच्या प्रत्येक पोस्टला न चुकता कमेंट किंवा रिप्लाय देताना दिसतो. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा आहे.

ऋषभ पंत – इशा नेगी

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याचे नाव त्याची मैत्रीण इशा नेगी सोबत जोडण्यात आले. इशा ही इंटेरियर डेकोरेटर आहे. ऋषभने स्वत: तिच्या सोबतचा एक फोटो 2019 मध्ये पोस्ट केला होता आणि तुझ्यामुळे मी आनंदी राहतो, असे फोटोला कॅप्शन दिले होतं. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये त्या दोघांचा बर्फाळ प्रदेशात सुट्टी एन्जॉय करतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे चाहत्यांना येत्या नव्या वर्षात ऋषभ पंत कोणता फोटो पोस्ट करतो याची उत्सुकता आहे.

लोकेश राहुल – अथिया शेट्टी

भारतीय संघाचा दमदार खेळाडू केएल राहुल याचे नाव अभिनेत्री आथिया शेट्टी हिच्यासोबत दिर्घकाळापासून जोडलं जात आहे. हे दोघे एकमेकांच्या फोटोला काहींना काही कमेंट्स करताना दिसतात. त्या दोघांनी एकत्र घालवतानाचे फोटो अनेक वेळा सोशल मीडियावर व्हयरल होतात. तसेच हार्दिक पांड्या किंवा लोकेशच्या जवळच्या व्यक्तींकडून त्यांच्या फोटोवर असणाऱ्या सूचक कमेंट्समुळे त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना अधिक जोर मिळतो.

इशान किशन – आदिती हुंडिया

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज इशानचं नाव अभिनेत्री आदिती हुंडिया हिच्या सोबत जोडण्यात आलं आहे. आदिती एक मॉडेल असून तिने 2018 च्या मिस दिवा सुपरनॅशनल स्पर्धेत विजेते पद पटकावलं होतं. 2019 मधील आयपीएलच्या फायनलमध्ये तिने हजेरी लावली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा रंगू लागली. त्यानंतर इशानच्या दमदार खेळीचा फोटो इन्स्टावर पोस्ट करून त्याला बेबी असे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यात अफेअर असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली.

शुबमन गिल – सारा तेंडुलकर

कोलकाताचा फलंदाज आणि भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल याच्याशी सारा तेंडुलकरचं नाव जोडलं जात आहे. या दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा मागील चार-सहा महिन्यांपासून रंगू लागली आहे. चालु हंगामातील आयपीएलमध्ये शुबमनने एक सुंदर झेल टिपला होता. त्यानंतर साराने झेल घेतानाचा त्याचा फोटो पोस्ट करत तो आपल्या स्टोरीवर पोस्ट केला आणि तिनं प्रेम व्यक्त करणारी इमोजीचा वापर केला. तेव्हापासून दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा रंगू लागली.