सारा तेंडुलकरनं शेअर केली शुभमन गिलच्या फील्डिंगची क्लिप, चालू असलेल्या अफवांना मिळालं ‘बळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्याविषयीच्या बातम्यांना मोठ्याप्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे

साराने इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटी क्लिप आयपीएल 2020 दरम्यान शेअर केली आहे, ज्याने अफवांच्या बाजाराला आणखी गरमी दिली. साराने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये शुबमन गिल डाइ मारून करून मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्य कुमार यादवचा शॉट रोखण्याचा प्रयत्न करीत आहे.

साराने ही पोस्ट ‘दिल की इमोजी’ सोबत शेयर केला आहे. ज्यामुळे या दोघांबद्दलच्या बातम्यांना आता प्रसिद्धी मिळत आहे.मात्र, आता ही पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नाही,परंतु चाहत्यांनी ती सेव्ह केली आहे, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडेच शुभमन गिल आणि साराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच कॅप्शनसह छायाचित्रे शेअर केली आहेत. यापूर्वी सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्रामवर ‘आई स्पाई’’ या मथळ्यासह स्वत:चे एक चित्र पोस्ट केले होते.

त्यानंतर लवकरच शुबमन गिलने त्याच ‘आई स्पाई’ कॅप्शन आणि इमोजीसह स्वत: चे एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like