Sara Tendulkar-Shubman Gill | सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच रंगली चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sara Tendulkar-Shubman Gill | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारतीय खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या अनेक सोशल मिडियावरील फोटोवरुन चांगलीच चर्चा सुरू असते. दरम्यान सध्याही एका पोस्टमुळे सोशल मिडियावर एकच चर्चा रंगली आहे. तर नेमकं काेणती पोस्ट शेअर केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ते पाहा. (Sara Tendulkar-Shubman Gill)

 

मंगळवारी संध्याकाळी शुभमन गिलने भारतीय महिला संघाचा जयजयकार करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचवेळी सारा तेंडुलकरने देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये बऱ्याच काळानंतर तिचा नवीन लूक दाखवला आहे. ज्यामुळे त्यांना मेड फॉर इच अदर (Made For Each Other) असे लोक म्हणू लागले आहेत. या दोघांची पोस्ट एकाच दिवशी पडल्यामुळे जोरदार चर्चा रंगलीय. दरम्यान, या दोघांनी एकाच दिवशी पोस्ट केले असले तरी, त्यांच्या पोस्टचा किंवा त्याच्या कॅप्शनचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. (Sara Tendulkar-Shubman Gill)

 

शुभमन गिलने इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडीओ शेअर केला. त्याच्या व्हिडीओमध्ये, त्याने न्यूझीलंड दौर्‍याच्या आधीच भारतीय महिला संघाचा जयजयकार केला. याला पोस्ट करताना लिहिले की,’व्हाईट फर्न्ससोबतच्या सामनादरम्यान निळ्या जर्सीतील महिलांना पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.’

 

साराने तिचा फोटो इंस्टा स्टोरीमध्ये पोस्ट करत लिहिले की, ‘कधीही वाटले नव्हते की मला हे सांगावे लागेल पण…’ त्यानंतर पुढील स्टोरीमध्ये साराने एक व्हिडीओ टाकला.
तसेच साराच्या पुढच्या स्टोरीत लंडनच्या रस्त्याचे दृश्य होते.
या व्हिडीओमध्ये तिने लिहिले की, ‘तीन वर्षांनंतर हिवाळ्यात लंडनला परतणे खूप आनंददायी आहे.’
सारा गेल्या काही दिवसांपासून भारतात होती. नुकतेच तिचे अनेक फोटो समोर आलेय, त्यामध्ये ती गोव्यात सुट्टी घालवताना दिसत आहे. त्यानंतर आता ती लंडनमध्ये परतली आहे. तर ,मुंबईत ती पंजाबी गायक एपी धिल्लॉनच्या कॉन्सर्टमध्ये मस्ती करताना दिसली. तसेच, हैदराबादमध्ये टायगर श्रॉफ आणि त्याच्या बहिणीने आयोजित केलेल्या फायटिंग इव्हेंटचाही आनंद घेताना सारा दिसली होती.

 

Web Title :- Sara Tendulkar-Shubman Gill | sachin tendulkar daughter sara tendulkar post her video on social media just before the her rumored boyfriend shubman gill also post video abut his waiting for women cricket team

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा