मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
बॉलिवूड स्टार किड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, तैमूर, अनन्या पांडे यांच्या पाठोपाठ आणखी एक स्टारकिड अचानक चर्चेत आली आहे.ती म्हणजे सारा तेंडुलकर सध्या इंटरनेटवर तिच्या फोटोने धूम माजविली आहे.
[amazon_link asins=’8131901378′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d381e0c9-84c8-11e8-ac78-3d53ae6c712f’]
सचिन तेंडुलकर याची ही कन्या काही दिवसांपूर्वी आकाश अंबानीच्या एंगेजमेंट पार्टीत दिसली होती. या पार्टीतील तिच्या लूकची बरीच चर्चाही सोशल मिडियावर रंगली होती.
काही महिन्यांपूर्वी सारा तेंडुलकर हिच्या फेक अकाऊंडवरुन शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले गेल्याने ती चर्चेत आली होती. ते फेक अकाऊंड तयार करणाºया सॉफ्टवेअर इंजिनिअरला पोलिसांनी अटकही केली होती.
सारा आता २० वर्षाची असून सध्या ती शिकतेय. आकाश अंबानीच्या एंगेजमेंट पार्टीतील फोटो नंतर पुन्हा तिची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरापासून तिच्या बॉलिवूड प्रवेशाची चर्चाही रंगतेय आहे.
सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये दिसू लागलेला हा गोड व सुंदर चेहरा बॉलिवूड चित्रपटांत कधी दिसेल, या प्रतीक्षेत चाहते आहेत. सारा बॉलिवूडमध्ये येणार वा नाही, याबद्दल तूर्तास सांगता येणार नाही. तिचे ताजे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही याचा अंदाज येईल.
क्रिकेटचा देव सचिन त्याच्या जीवनात साराला त्याची प्रेरणा मानतो. यामागचे कारण म्हणजे, अगदी अल्लड वयात साराने वडिलांना चांगले काम करण्यासाठी दिलेली प्रेरणा. सचिन कोणत्याही कार्यक्रमात त्याच्या मुलीचे कौतुक करायला विसरत नाही.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e49537c3-84c8-11e8-9a23-d5759a6b7bdd’]