सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार

पिंपरी : पोलीनामा ऑनलाईन – गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मनिष गोविंद राठी (रा. पिंपळे गुरव) याला तडीपार करण्यात आले असून त्याच्या तडीपारीचे आदेश परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिले.

मनिष राठी हा सांगवी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, विनयभंग, दंगल, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मनिष राठी याची सांगवी परिसरामध्ये गुन्हेगारी फोफावली असून त्याची परिसरात दहशत आहे. सांगवी पोलिसांकडून राठी याच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्यानुसार परिमंडळ २ च्या उपायुक्तांनी राठी याच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत.ही कारवाई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस नाईक अनिल जगताप, पोलीस नाईक चंद्रकांत भिसे, पोलीस शिपाई शशिकांत देवकाते यांनी केली.