Saral Pension | फायद्याची गोष्ट ! LIC ने आणलाय 40 च्या वयात पेन्शन देणारा जबरदस्त प्लान, जाणून घ्या अटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Saral Pension | वयाच्या चाळीशीपासून आयुष्यभर पेन्शनचा लाभ देणारी LIC ची सरल पेन्शन योजना (Saral Pension) आहे. या योजनेची अट ही आहे की मासिकऐवजी एकरक्कमी पैसे द्यावे लागतील. शिवाय पॉलिसी सुरू झाल्याच्या 6 महिन्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा आहे.

तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल. पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे.

म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळत राहील. यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे.

यामध्ये पती किंवा पत्नी, जो जास्त काळ जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळते.
जेव्हा दोघेही जिवंत नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल.
या प्लानमध्ये पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर पॉलिसी होल्डरला कोणत्याही वेळी लोन मिळेल.

जर तुमचे वय 40 वर्ष आहे आणि तुम्ही 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम जमा केला
तर तुम्हाला वार्षिक 50250 रुपये म्हणजे मासिक 4187 रुपये मिळू लागतील, जे आयुष्यभर मिळतील.

याशिवाय जर तुम्हाला मध्येच जमा केलेली रक्कम परत हवी असेल कारण तुम्हाला पैशाची गरज आहे
तर आ स्थितीत 5 टक्केची कपात करून जमा रक्कम परत दिली जाते.

जर तुम्हाला प्लान घ्यायचा आहे तर एलआयसीच्या वेबसाइट किंवा ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण माहिती घ्या.
ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते.

Web Title : Saral Pension | lic has brought dhansu plan give pension age 40 know what are its conditions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update