Saral Pension Yojana | LIC चा धमाकेदार प्लान ! एकदाच पैसे जमा केल्यानंतर मिळेल आयुष्यभर ‘पेन्शन’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Saral Pension Yojana | भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) एक पॉलिसी घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर दर महिना पेन्शनचा लाभ घेऊ शकता. एलआयसीच्या या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) आहे. विशेष म्हणजे या पॉलिसीत एकदाच प्रीमियम भरावा लागेल. नंतर आयुष्यभर पेन्शन मिळत राहील.

योजनेचा लाभ घेण्याची पद्धत

तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर (Saral Pension Yojana) मिळेल. पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे.

एकाच्या नावावर असेल पेन्शन (सिंगल लाईफ)

म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळत राहील. यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे.

पती-पत्नीपैकी एकाला मिळत राहील पेन्शन (जॉईंट लाईफ)

यामध्ये पती किंवा पत्नी, जो जास्त काळ जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही जिवंत नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल.

 

जाणून घ्या वैशिष्ट्ये

विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याची पेन्शन सुरू होईल.

मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता.

ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते.

या योजनेत 12000 रुपये वर्षाचे किमान लावाले लागतील. यात कमाल मर्यादा नाही.

तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल.

शिवाय पॉलिसी सुरू झाल्याच्या 6 महिन्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा आहे.

 

Web Title : Saral Pension Yojana | family members gave heart once person living wealth filled pension

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Driving License | खुशखबर ! जर मोबाइलमध्ये असेल डॉक्यूमेंट्सची कॉपी तर भरावे लागणार नाही चलान, जाणून घ्या नवीन नियम

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Sinhagad Road Flyover | पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन (व्हिडिओ)