Saral Pension Yojana | तुम्ही एकदा प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवू शकता पेन्शन, जाणून घ्या ‘या’ विशेष योजनेबाबत सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Saral Pension Yojana | तुम्ही सुद्धा पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लान घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना केवळ एकदाच तिचा प्रीमियम भरावा लागतो आणि यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळत राहिल. या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) आहे.

 

LIC सरल पेन्शन योजना एक सिंगल प्रीमियम प्लान आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून झाली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

सरल पेन्शन योजना घेण्याच्या 2 पद्धती :
– तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल. पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे.

 

सिंगल लाईफ :
– म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळत राहील. यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे.

 

जॉईंट लाईफ :
– यामध्ये पती किंवा पत्नी, जो जास्त काळ जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही जिवंत नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल.

 

सरल पेन्शन योजनेची (Saral Pension Yojana) वैशिष्ट्ये :

विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याची पेन्शन सुरू होईल.

मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता.

ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते.

या योजनेत 12000 रुपये वर्षाचे किमान लावाले लागतील. यात कमाल मर्यादा नाही.

तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल.

शिवाय पॉलिसी सुरू झाल्याच्या 6 महिन्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा आहे.

 

Web Title :- Saral Pension Yojana | invest one time money and get rupees 12000 per month pension check all details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Life Certificate | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! आता पेन्शन मिळवण्यासाठी केवळ तुमचा चेहरा उपयोगी येईल, कागदपत्रे जमा करण्याची नाही आवश्यकता

Pune Coronavirus Restriction | ‘ओमिक्रॉन’च्या धास्तीने पुण्यात पुन्हा निर्बंध ! चित्रपटगृहात 50 % प्रेक्षकांनाच प्रवेश; जाणून घ्या सुधारीत नियम

Gold Silver Price Today | महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव