Saral Pension Yojana | दरमहा पाहिजेत 12000 रुपये तर केवळ 1 वेळ प्रीमियम देऊन घ्या LIC चा ‘हा’ विशेष प्लान, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Saral Pension Yojana | तुम्ही एखादा पेन्शन प्लॅन घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) एक जबरदस्त प्लान घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. या पॉलिसीचे नाव आहे सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) आहे.

 

LIC सरळ पेन्शन योजना एक सिंगल प्रीमियम प्लान आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून झाली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात –

 

सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) घेण्यासाठी 2 पद्धती :

 

पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे.

 

सिंगल लाईफ :

 

पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे. म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळत राहील. यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

 

जॉईंट लाईफ :

 

दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे. यामध्ये पती किंवा पत्नी, जो जास्त काळ जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही जिवंत नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल. (Saral Pension Yojana)

 

सरल पेंशन योजनेची वैशिष्ट्ये

 

  • विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याची पेन्शन सुरू होईल.
  • मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता.
  • ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते.
  • या योजनेत 12000 रुपये वर्षाचे किमान लावाले लागतील. यात कमाल मर्यादा नाही.
  • तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल.
  • शिवाय पॉलिसी सुरू झाल्याच्या 6 महिन्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा आहे.

 

Web Title : Saral Pension Yojana | just one time investment and earn 12000 rupees per month in this lic policy know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NPCIL Palghar Recruitment 2021 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडियामध्ये 250 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

Pune Accident | पुण्यात दारुने भरलेला ट्रक पलटी; दारूचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना दणका ! हाय कोर्टानं समन्स रद्द करण्यास दिला नकार, केली ‘ही’ सूचना