home page top 1

सारा सैफ अली खानचा पहिला ‘खुल्लमखुल्ला’ स्टेज परफॉर्मन्सनं ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री सारा अली खान अशी अभिनेत्री आहे जिने खूप कमी काळात आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. सध्या सारा आपल्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. साराचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. साराच्या या धमाकेदार डान्सचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सारा तिच्याच सिम्बा या सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे. साराने स्वत:चा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये सारा म्हणते, “माझा पहिला स्टेज परफॉर्मंस” साराचा हे सादरीकरण आयफा अवॉर्ड 2019चं आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच सारा लव आज कल या सिनेमाच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत काम करताना दिसेल. याशिवाय कुली नंबर 1 या सिनेमातही सारा वरुण धवनसोबत काम करताना दिसणार आहे.

Visit  :Policenama.com

Loading...
You might also like