…म्हणून सरस्वती पूजेवरून बांगलादेशात उफळला ‘वाद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांग्लादेशमध्ये सरस्वती पूजा संबंधित वाद झाला आहे. बांग्लादेशच्या उच्च न्यायालयाने ढाका दोन निवडणूकीच्या तारीख बदलण्याची याचिका रद्दबातल ठरवली आहे. निवडणूकीच्या तारखांना सरस्वती पूजा होत आहे, त्यामुळे हिंदू समुदायाने निवडणूकीच्या तारखा बदलण्याची याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने खंडपीठाचे जस्टिस जेबीएम हसन आणि जस्टिस एमडी खैरुल आलम यांनी मंगळवारी याचिकेची सुनावणी केली त्यानंतर राज्य आणि निवडणूक आयोगाने आदेश जारी केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याचिकाकर्ते संतप्त झाले आहेत. शाहबाग रस्त्यावर आंदोलनकारी जमा झाल्याने रस्तावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ढाका यूनिवर्सिटीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी जवळपास अडीच तास ब्लॉक ठेवला होता. विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाच्या तारखा बदलण्यासाठी एक दिवसाचा कालावधी मागीतला आहे. आयोगाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर विद्यार्थ्यांकडून आयोगला घेरण्यात येणार आहे. याचिका कर्ता आणि वकील अशोक कुमार घोष यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम्ही त्रस्त आहोत आणि या आदेशाच्या विरोधात अपील डिव्हीजनमध्ये जाऊ. 22 डिसेंबरला निवडणूक आयोगाने घोषणा केली होती की ढाका साऊथ सिटी कॉर्पोरेशन आणि ढाका नॉर्थ सिटी कॉर्पोरेशनने निवडणूक 30 जानेवारीला करण्यात येईल. आयोगाच्या निर्णयाविरोधात हिंदु समुदायाने याला विरोध केला, कारण 29, 30 जानेवारीदरम्यान सरस्वती पूजेचा सण आहे. तर या प्रकरणी सरकारद्वारे स्कूल कॅलेंडरमध्ये 29 जानेवारीला सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

पूजा परिषद आणि बांग्लादेश बुद्धिस्ट क्रिस्चियन यूनिटी कौन्सिलसह अनेक हिंदू संघटनांनी निवडणूक आयोगाला सण साजरा करायचा असल्याने निवडणूकीच्या तारखा बदलण्याची मागणी होत आहे. दोन्ही कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सरस्वती पूजा उत्साहात साजरी केली जाते परंतु निवडणूकीदरम्यान याच संस्थांचा मतदार केंद्र म्हणून वापर केला जातो. निवडणूक आयोगाने तारखा बदलण्यास नकार दिल्यानंतर अशोक कुमार घोष नावाच्या वकीलाने उच्च न्यायालयात 5 जानेवारीला याचिका दाखल केली होती. ढाका यूनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस आंदोलन सुरु ठेवले आहे आणि न्यायालयाकडून सुनावणीची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. परंतु न्यायालयाने याचिका रद्दबातल ठरवली.

उच्च न्यायालयाने पाहिले की शिक्षा मंत्रालयाने 29 जानेवारीला सरस्वती पूजेला सुट्टी जाहीर केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॅलेंडरमध्ये सरस्वती पूजेला सुट्टी दाखवली आहे, परंतु निवडणूक आयोगाने 30 जानेवारी ही तारीख यासाठी निश्चित केली की 2 फेब्रुवारीपासून शाळांमध्ये परिक्षा सुरु होणार आहेत. याचिका रद्दबातल ठरवण्यापूर्वी न्यायालयाने सांगितले की या परिस्थित निवडणूकीच्या तारखा बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like