सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार मयूर उर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय-२४ रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) याला दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

राकेश कुंबरे याच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या साथिदारांसह दहशत माजवणे, घातक शस्त्र बाळगणे, खूनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कोथरुड परिसरात त्याची दहशत असल्याने कोथरुड पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव परीमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी सराईत गुन्हेगार राकेश कुंबरे याच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत. कुंबरे याच्या तडीपारीचे आदेश सोमवारी (दि.११) देण्यात आले. तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार परिसरात दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.