कधीकाळी सायकलवरून टाकायचा पेपर, ‘कंचना’मध्ये साकारला होता ‘ट्रान्सजेंडर’ ! पर्सनल लाईफही खूपच इंटरेस्टींग

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा (Akshay Kumar) लक्ष्मी (Laxmii) हा सिनेमा 9 नोव्हेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney+ Hotstar) रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरची म्हणजेच तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार आहे. कंचना (Kanchana) या तमिळ सिनेमाचा हा रिमेक आहे. तुम्हाला हे माहित आहे का कंचना या सिनेमात ट्रान्सजेंडरची भूमिका ही कोणी साकारली होती. अनेकांना माहिती नसेल परंतु सुप्रसिद्ध अभिनेता शरद कुमार यानं ही भूमिका साकारली होती.

शरद कुमार याचं खरं नाव रामानाथन शरद कुमार (Ramanathan Sarathkumar) आहे. शरद कुमार हा अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय आहे.

कधी काळी टाकत होता सायकलवरून पेपर

शरद कुमार हा एक स्पोर्टपर्सनही आहे. फुटबॉल, क्रिकेट हॉकीमध्ये त्यानं शाळा आणि कॉलेजचं प्रतिनिधित्व केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरदनं दीनाकरण या तमिळ वृत्तपत्रात नोकरी केली. सायकल वरून दुकानात पेपर टाकायचं काम तो करत होता. पुढे तो याच वृत्तपत्राचा पत्रकार बनला. अर्थात काही काळ. कराण यानंतर शरदनं स्वत:चा बिजनेस सुरू केला. चेन्नईत त्यानं स्वत:ची ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. याच दरम्यान त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि तो फिल्मी दुनियेत आला.

शरदनं केली दोन लग्नं

शरदच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यानं दोन लग्नं केली आहेत. पहिल्या पत्नीपासून त्याला 2 मुली आहेत. पहिल्या पत्नीसोबत संसार सुरू असतानाच शरद आणि अभिनेत्री नगमा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांमुळं पहिल्या पत्नीनं त्याला घटस्फोट दिला. पुढं नगमाही त्याच्या आयुष्यातून गेली. 2001 साली शरदनं अभिनेत्री राधिकासोबत दुसरं लग्न केलं. दोघांना एक मुलगा आहे.

शरदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 130 पेक्षा अधिक तमिळ, मल्याळम, तेलगू व कन्नड सिनेमात काम केलं आहे. 1986 मध्ये समाजमलो स्त्री या सिनेमातून त्यानं करिअरला सुरुवात केली होती. पहिल्याच सिनेमात त्याच्या वाट्याला निगेटीव्ह रोल आला. मात्र यानंतर तो सपोर्टींग रोलमध्ये दिसू लागला.