Sarathi Ganesh Utsav Guide 2023 | पुणे पोलिसांच्या ‘सारथी गणेश उत्सव गाईड 2023’ लिंकचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

पुण्यात येणाऱ्या गणेश भक्तांना गणेश मंडळे, बंद रस्ते, पार्किंगची माहिती मिळणार एका क्लिकवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sarathi Ganesh Utsav Guide 2023 | पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे (Pune Police Traffic Branch) नागरिकांना गणेश उत्सव कालावधीमध्ये प्रवास सहज सुलभ होण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागामधील प्रतिष्ठित गणपती मंडळाचे अंतर व वाहनांचे पार्किंगची सुविधा एका क्‍लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ‘सारथी गणेश उत्सव गाईड 2023’ (Sarathi Ganesh Utsav Guide 2023) लिंकचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis), पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी खासदार अमर साबळे (Former MP Amar Sable), आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), सिध्दार्थ शिरोळे (Siddharth Shirole), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijay Kumar Magar), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol), माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कसबा गणपती मंडळाचे (Kasba Ganapati Mandal) अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी उपस्थित होते.

पुण्यातील गणेश उत्सव (Pune Ganesh Utsav) अनुभवायचा असेल तर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात यावे लागते. शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे या ठिकाणी गर्दी होत असते. तेथे दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे पार्किंग (Vehicle Parking) करीता जवळची वाहनतळे यांची खात्रीशीर माहिती तसेच उत्सव काळातील बंद रस्ते, पर्यायी चालू रस्ते यांची माहिती असलेले हे गाईड बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. पुण्याला लाभलेल्या या ऐतिहासिक आणि परंपरागत उत्सवात अधिकाधिक नागरिकांना व पर्यटकांना सहभागी होता यावे या उद्देशाने ‘सारथी गणेश उत्सव गाईड 2023′ ची (Sarathi Ganesh Utsav Guide 2023) निर्मिती केली आहे.

‘सारथी गणेश उत्सव गाईड 2023′ ची वैशिष्ट्ये

– या गाईडचे माध्यमातून शहराचे मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे, वाहनतळ, यांचा मार्ग पाहता येणार आहे.

  • वाहनतळ -एकूण 5 शाळा, 7 कॉलेज यांचे मैदान संध्याकाळी 6.00 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4.00 वाजेपर्य़ंत उपलब्ध होणार आहेत. तसेच पार्किंग करिता पुणे मनपाकडील, इतर खाजगी वाहनतळ, नदीपात्र इत्यादी ठिकाणांची माहिती लोकेशनुसार उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
    – उत्सव काळातील बंद रस्ते व त्यांचे पर्यायी मार्ग यांचे मार्गदर्शन लाभेल.
    – गणेश उत्सव काळातील शहरातील रिंगरोडची माहिती या मॅपवर असेल.
    – उत्सव काळात शहरातील मध्यवर्ती भागातील अवजड वाहतूकीसाठी बंदी असलेले मार्ग यांची माहिती मिळू शकेल.
    – तसेच उत्सव काळात गणेश मुर्ती विसर्जन घाटांची माहिती लोकेशनसह मिळणार.
  • जास्तीत जास्त नागरिकांना पुण्यातील गणेश उत्सव अनुभवणे सोईस्कर व्हावे याकरिता सारथी’ गणेश उत्सव गाईड लिंक व क्‍यू आर कोडची प्रसिध्दी सोशल मिडीया, वृत्तपत्र, सर्व वाहनतळ, बसस्थानके, रेल्वे स्थानके, खाजगी ट्रॅव्हल्स थांबे, महत्वाचे चौक, गणेश मंडळे, शहरातील सर्व उपलब्ध एल.ई.डी. स्क्रिनवर या ठिकाणी बॅनर स्वरुपात लिंकची माहिती उपलब्ध केली जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Womens Reservation Bill | महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी 9 वर्ष का लागली? भाजपला खोचक टोला लगावताना काँग्रेसने म्हटले…

Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद

ACB Trap News | लाच घेताना महिला व्यवसाय कर अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics |राज्यात राजकीय हालचालींना वेग, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भाजपाचा प्लॅन बी तयार?, बावनकुळे म्हणाले…

Pune Ganesh Festival 2023 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी, पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेश