अभिनेत्री निया शर्मासोबत रवी दूबेच्या ‘किसिंग’ सीनवर त्याच्या पत्नीची ‘अशी’ प्रतिक्रिया !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘जमाई राजा’ या टीव्ही मालिकेचा ‘जमाई २.०’चा दुसरा सीझन आज मालिकेच्या स्वरुपात प्रदर्शित झाला आहे. यात रवी दुबे आणि निया शर्माची जोडी पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकण्यासाठी आली आहे. टीव्हीचे हे सुपरहिट कपल या मालिकेत किसिंग सीन करतानाही दिसणार आहे. आता या दोघांच्या किसिंग सीनबद्दल अशी एक बातमी समोर आली आहे, ज्यावर आपला विश्वास ठेवणार नाही.

मिळालेल्या माहितीनूसार, रवी दुबेला निया शर्मासोबत किसिंग आणि बोल्ड सीन करण्यासाठी त्याची पत्नी सरगुन मेहताने सांगितले होते. यापूर्वी सीरियलमध्ये रवीला त्याच्यासोबतच्या को-स्टारसोबत किस करताना पाहिले गेले नाही, म्हणून त्यामुळे तो या सीनसाठी कंफर्टेबल नव्हता. पण निर्मात्यांचे असे म्हणणे होते की, या सीरिजमध्ये हा सीन खूप महत्वपुर्ण होता. अशामध्ये त्याची पत्नी सरगुन मेहताने स्वतः रवीला त्याबद्दल समजावून सांगितले. यानंतर रवीने हा सीन शूट केला.

रवीने याबद्दल सांगितले की, “माझ्या 15 वर्षांच्या कारकीर्दीत मी असा सीन कधी केला नाही. त्यामुळे मी खूप नर्वस होतो. वास्तविक जीवनात सरगुन कधीही अशा गोष्टींचा ताण घेत नाही. मी तिला किसिंग सीनबद्दल सांगितले. हा सीन करण्यासाठी तिने मला समजावले.  मी माझ्या किसिंग सीनबद्दल आई आणि सासूशी देखील बोललो.

image.png

रवी पुढे म्हणाला, “मला माझ्या को-स्टार निया शर्मा हिला पूर्ण श्रेय द्यायचं आहे. जिने हा मला सीन करण्यासाठी सहाय्य केले. आता जेव्हा मी हे पडद्यावर पाहिले तेव्हा मला असे काहीही वाटले नाही की त्यात काही अनकंफर्टेबल आहे.”

image.png

‘जमाई राजा’ या मालिकेचे टेलिकास्ट झी टीव्हीवर जवळजवळ तीन वर्षे चालू आहे. त्यावेळी ही मालिका टॉप टीआरपीमध्ये असायची. आता ही मालिका नवीन वळण आणि नवीन मालिकेच्या स्वरूपात प्रदर्शित झाली आहे. ही मालिका Zee5 वर प्रवाहित होत आहे.

image.png

काल जमाई २.० चे स्क्रिनिंग मुंबईत पार पडली, ज्यात संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होते. त्यादरम्यान प्रत्येकाची नजर रेड ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत असलेली मालिकेची लीडिंग लेडी निया शर्मावर होती. निया शर्मा तिच्या बोल्डनेससाठी नेहमीच चर्चेत असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like