Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank | सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द, ‘या’ कारणामुळे RBI ने केली कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीमधील (Sangli) सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकरी बँकेचा (Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank) परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी (दि.2) रद्द (License Cancel) केला आहे. सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. यासंदर्भात आरबीआयने एक पत्रक जारी केले आहे.

 

RBI ने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, परवाना रद्द झाल्यानंतर सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकरी बँक लिमिटेड चे बँकिंग व्यवहार बुधवारी कामकाजाच्या दिवशी समाप्त झाल्यासोबतच बंद करण्यात आले. महाराष्ट्रातील सहकार आयुक्त (Maharashtra Co-Operation Commissioner) आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांनाही (Registrar of Co-operative Societies) बँक बंद करण्याचे आदेश जारी करुन कर्जदारासाठी लिक्विडेटर (Liquidator) नेमण्याची विनंती करण्यात आली आहे, असंही पत्रकात म्हटले आहे.

 

ठेवीदारांचे मिळणार इतकी रक्कम
आरबीआयने सांगितले की लिक्विडेशनवर प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसीकडून (DICGC) पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा (Deposit Insurance) दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असेल.

 

RBI ने 3 बँकांना ठोठावला दंड
आरबीआयने यापूर्वी तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता.
आरबीआयने छत्तीसगडच्या रायपूरमधील नागरिक सहकारी बँक लि. सह तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता.
या बँकांना नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच आरबीआयने जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला (पन्ना) एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

Web Title :- Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank | reserve bank of india cancels licence of sangli based sarjeraodada naik shirala sahakari bank

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा