SBI PO RECRUITMENT ; अर्ज भरण्यासाठी केवळ ७ दिवस बाकी

अर्ज भरण्यासाठी या साईटवर क्लीक करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी (SBI PO) २००० जागा भरण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी २ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी केवळ ७ दिवस बाकी राहिले आहेत.

SBI PO पदासाठी परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार असून पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला मुख्य परीक्षा द्यायची संधी मिळेल. मुख्य परीक्षेत शाॅर्टलिस्ट झाल्यानंतर ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू देता येईल. अंतिम मेरिट लिस्टला मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स ग्राह्य धरले जातील.

८, ९, १५ आणि १६ जून २०१९ रोजी पुर्व परीक्षा होणार आहे. जुनच्या २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यात मुख्य परीक्षेसाठी हॉलतिकीट येईल. तर २० जुलै २०१९ ला मुख्य परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल.

– पदांची संख्या
एकूण २००० पदासांठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये ८१० जागा या जनरलसाठी असणार आहे. तसेच EWS २००, OBC ५४० ST १५०, तर SC ३०० साठी या पदांची भरती होणार आहे.

– शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ३० वर्ष. उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९८९ च्या आधी नको.
(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

 • नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेहीपरीक्षा फी – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १२५/- रुपये आहे.
 • पुर्व परीक्षा
  पुर्व परीक्षा ८, ९, १५ आणि १६ जून २०१९  रोजी होणार.
 • मुख्य परीक्षा
  २० जुलै २०१९ ला मुख्य परीक्षा होणार
 • बेसिक सॅलरी
  ज्युनियर मॅनेजमेंट ग्रँड स्केल १ उमेदवाराला सुरुवातीला २७,६२० रुपये पगार मिळेल. सोबत ४ अ‍ॅडव्हान्स इन्क्रिमेंट मिळतील.
 • अर्ज कारण्यासाठी प्रक्रिया
  https://bank.sbi/careers या वेबसाइटवर रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर, रजिस्टर केल्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल.
Loading...
You might also like