Sarkari Jobs: ‘इथं’ सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेविना होईल निवड, शेवटची तारीख जवळच, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, बीईएलने १०० डिप्लोमा ऍप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बीईएलने गाझियाबाद युनिटसाठी हे अर्ज मागवले आहेत. डिप्लोमा उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी (BEL Diploma Apprentice Recruitment 2020) अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी बीईएल http://www.bel-india.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- १० ऑगस्ट २०२०

वेतन
डिप्लोमा ऍप्रेंटिस- १०,४०० रुपये दर महिना

पदांचा तपशील
मॅकॅनिकल- २९
संगणक शास्त्र- १५

मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट अँड सेक्रेटेरियल प्रॅक्टिस- १०
इलेक्ट्रॉनिक्स- ३२
इलेक्ट्रिकल- ०८
सिव्हिल-०६

एकूण पदांची संख्या- १००

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम केलेला असावा. AICTE मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेतून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या या पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा २३ वर्षे आहे. ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत २३ वर्षे वयाची मर्यादा पूर्ण करणारा कोणताही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. २३ वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे, यापेक्षा कमी वयाचे उमेदवार देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या या पदांवर भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. त्या डिप्लोमाद्वारे मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

असा करा अर्ज

या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना BOAT पोर्टलद्वारे ऑनलाईन या http://www.mhrdnats.gov.in/ साईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.