‘पदवीधरांसाठी’ MRPL मध्ये सरकारी नोकरीची ‘उत्तम’ संधी ! ‘वेतन’ 38,000 पेक्षा जास्त, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळूर रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडमध्ये (MRPL) भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. 223 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही नोकरीची मोठी संधी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार mrpl.co.in या वेबसाइटवर अर्ज करु शकतात. पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवार 9 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करु शकतात.

लेखी परिक्षा, स्किल टेस्ट, फिजिकल एलिजिबिलिटी टेस्ट आणि कागदपत्र पडताळणी या आधारे पदांची भरती होईल. परंतू या टेस्टसाठी तारखा जाहिर करण्यात आल्या नाहीत.

पद
सिक्युरिटी इंस्पेकटर
जूनिअर ऑफिसर
ट्रेनी असिस्टेंट

पात्रता
वयोमर्यादा 
सिक्युरिटी इंस्पेकटर पदांसाठी अर्ज करण्याची अधिकतम वयोमर्यादा 45 आहे. तर जूनिअर ऑफिसर आणि ट्रेनी असिस्टेंट पदांसाठीची वयोमर्यादा 38 वर्ष 41 वर्ष आहे. दुसऱ्या पदांसाठीच्या अर्जाची वयोमर्यादा 26 वर्ष असेल. सरकारी नियमानुसार आरक्षणात उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

शैक्षणिक पात्रता 
कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून उमेदवाराने 60 टक्क्यांनी पदवी पूर्ण केलेली असावी. आरक्षित उमेदवारांना सूट मिळेल. पदानुसार शैक्षणिक योग्यतेत सूट देण्यात आली आहे.

परिक्षेचा आराखडा
लेखी परिक्षेत 120 मल्टिपल च्वाइस प्रश्न असेल. यात दोन सेक्शन आहेत. पहिल्या सेक्शनमध्ये 40 मार्काला असेल तर जनरल अवेअरनेसचे प्रश्न असतील आणि दुसऱ्या विषयावर आधारित 80 मार्काला प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असेल. यात नेगेटिव मार्किंग नसेल. उमेदवारांना 60 मार्क पाडणे आवश्यक आहे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 50 टक्के मार्क पाडणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज 
1. MRPL च्या mrpl.co.in अधिकृत वेबसाइटवर जा.
2. होम पेजवर careers वर क्लिक करा त्यात human resource वर क्लिक करा.
3. तेथे दिलेल्या recruitment in non-management cadre वर क्लिक करा.
4. एक नवे पेज ओपन होईल, तेथे ‘apply online’ वर क्लिक करा.
5. माहिती वाचून घ्या आणि कंटिन्यूवर क्लिक करा.
6. तेथे अर्ज पूर्ण भरा आणि कागदपत्र अपडेट करुन submit वर क्लिक करा.

परिक्षा शुल्क 
उमेदवाराला अर्ज पूर्ण भरल्यानंतर 100 रुपये परिक्षा शुल्क भरावे लागेल जे रिफंड होणार नाही.

वेतनमान 
JM3 ग्रेड मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला एका वर्षासाठी प्रोबेशन पीरियडवर ठेवले जाईल. त्यांना 13,800 ते 38,500 रुपयांपर्यंत वेतनमान देण्यात येईल.

Visit  :Policenama.com

You might also like