12 वी पास उमेदवारांसाठी ‘सरकारी’ नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ जागांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने असिस्टेंट सब-इंस्पेक्टर या पदांसाठी भरती सुरु केली असून यामध्ये 1,314 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव एग्जामच्या माध्यमातून हि भरती करण्यात येणार असून या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी cisf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची सुरुवात सुरु झाली असून 9 डिसेंबरपर्यंत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.

या पदांसाठी वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे जास्तीतजास्त 35 वर्ष असावे. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीतील उमेदवारांसाठी यामध्ये पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अनुभव : कॉन्स्टेबल ,जीडी, हेडकॉन्स्टेबल या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 1 ऑगस्ट 2019 पर्यंत किमान पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

अशापद्धतीने करा अर्ज
cisf.gov.in या वेबसाईटवर अर्ज करा
त्यानंतर Assistant sub-inspector LDCE’ या लिंकवर क्लिक करा या ठिकाणी उपलब्ध असणारा फॉर्म व्यवस्थित भरा त्यानंतर फॉर्म अपलोड करा आणि शुल्क भरून त्याची प्रिंट स्वतःजवळ ठेवा.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like