काय सांगता ! होय, ‘या’ राज्यात 1000 हून जास्त सरकारी नोकर्‍या, कॅबिनेटनं दिली मंजूरी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांना बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. मुजफ्फरपुरातील श्री कृष्णा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (एसकेएमसीए) मध्ये भरतीसाठी राज्य मंत्रिमंडळाने 1039 पदे मंजूर केली आहेत. एसकेएमसीएचमधील 652 बेडची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही भरती केली जाईल. त्याअंतर्गत डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रधान सचिव दीपक प्रसाद यांनी बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने केलेल्या या मंजुरीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, एसकेएमसीएचमधील 652 बेडच्या वाढीचा विचार करता राज्य मंत्रिमंडळाने 1,039 अतिरिक्त प्राध्यापक, डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या भरतीस मान्यता दिली आहे.

एसकेएमसीएचमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या बेडची संख्या 638 इतकी आहे. या व्यतिरिक्त या रुग्णालयात प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत सुपर स्पेशलिटी ब्लॉक, एमसीएच इमारती, पीआयसीयू इमारती आणि ट्रॉमा सेंटर बांधण्यात येणार आहेत.

कॅबिनेटचे प्रधान सचिव दीपक प्रसाद यांनीही माहिती दिली की, कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने राबविलेल्या लॉकडाऊन दरम्यान, व्यावसायिक वाहने, प्रवासी आणि मालवाहक वाहनांवर कर जमा करण्याची वेळ 30 जून करण्यात आली आहे.

लवकरच राज्य सरकार एसकेएमसीएचमधील भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करेल, ज्या अंतर्गत 1,039 पदांसाठी भरती होईल. तरुणांना शासकीय नोकरी मिळण्याची ही सुवर्णसंधी असेल.