IBPS Clerk : सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! 4000 हून जास्त ‘व्हॅकन्सी’, करा अर्ज अन् जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – IBPS Recruitment 2020, Sarkari Naukri 2020 : इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सीलेक्शन (आयबीपीएस) ने क्लार्क पदाच्या भरतीसाठी 4 हजारपेक्षा जास्त व्हॅकन्सी जारी केली आहे. या अंतर्गत ग्रॅज्युएट उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील. आयबीपीएसने अगोदर क्लार्कच्या 1557 पदांवर भरतीसाठी व्हॅकन्सी काढली होती. त्यानंतर लेटेस्ट नोटिफिकेशन अंतर्गत 2557 पदांवर व्हॅकन्सी काढली आहे. जारी नोटिफिकेशन अंतर्गत क्लार्कच्या पदावर एकुण 4,114 उमेदवारांची भरती केली जाईल. उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

* पदाचे नाव : क्लार्क (क्लेरिकल कॅडर)

* पदांची संख्या : 1557+2557 = 4,114

* शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून बॅचलर डिग्री

* वयोमर्यादा : वय 20 ते 28 वर्ष (01 सप्टेंबर 2020 च्या आधारावर)

* पगार : पे स्केल 7,200 -19,300/- रुपये

IBPS Clerk : अर्जाचे शुल्क
जारी पदांवर सामान्य/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गाच्या उमेदवारांना 850 रुपये, तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी वर्गाच्या उमेदवारांना 175 रुपये जमा करावे लागतील. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेटमधून भरता येईल.

महत्वाच्या तारखा
1 ऑनलाइन अर्जाची सुरूवात – 02 सप्टेंबर 2020

2 ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख- 23 सप्टेंबर 2020

3 अर्ज शुल्क जमा करण्याची अखेरची तारीख- 23 सप्टेंबर 2020

4 कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख – प्रिलिमिनरी 18 नोव्हेंबर 2020

5 ऑनलाइन परीक्षेची तारीख- प्रिलिमिनरी 05, 12 और 13 डिसेंबर 2020

6 ऑनलाइन परीक्षेचा निकाल – प्रिलिमिनरी 31 डिसेंबर 2020

7 ऑनलाइन परीक्षा (मेन)- 24 जानेवारी 2021

अर्जाची प्रक्रिया
IBPS Clerk च्या पदांवर उमेदवारांसाठी अर्ज ऑनलाइन मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर जावे आणि दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआऊंट घेऊन पुढील प्रक्रियेसाठी सुरक्षित आपल्याकडे ठेवावी.

निवड प्रक्रिया
IBPS Clerk च्या पदांवर अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रिलिमिनरी आणि मेन एग्झामच्या आधारावर केली जाईल.