खुशखबर ! रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी, 14 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत इलेक्ट्रीशियन, फिटर, वायरमनसह 570 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार असून दहावी उत्तीर्ण उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेकडून 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले गेले आहे. 100 रुपये निश्चित अर्ज शुल्क आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे 15 फेब्रुवारी 2020 ते 15 मार्च 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पूर्व रेल्वे भरती 2020 : रेल्वे भरती मंडळाने (RRB) वेगवेगळ्या विभागातील अनेक पदे रिक्त केली आहेत. पूर्व रेल्वे क्षेत्र कोलकातामध्ये, ट्रेड अ‍ॅप्रेंटीस अंतर्गत 2792 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. रेल्वे भरती मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया14 फेब्रुवारी 2020 पासून ते 13 मार्च 2020 पर्यंत सुरू होईल. या पदासाठी 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

वयाची मर्यादा आणि अर्जाची फी
अर्जासाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले गेले आहे. पूर्व रेल्वे विभाग कोलकातामध्ये प्रशिक्षु पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल, तर महिला व अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांना फी भरावी लागणार नाही. पात्र व इच्छुक उमेदवार अधिकृत सूचना तपासण्यासाठी येथे क्लिक करुन अर्ज करू शकतात.