MP : हाय कोर्टात पदवीधरांसाठी मेगा भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (एमपीएचसी) दिवाणी न्यायाधीशांच्या पदांवर नियुक्तीसाठी 250 हून अधिक रिक्त जागा जारी केल्या आहेत. कायद्यातील पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. जाहीर झालेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीचे अनुसरण करू शकतात.

पदाचे नाव : दिवाणी न्यायाधीश
पोस्ट संख्या : 252
वेतनश्रेणी : 27700 – 44770 रूपये

शैक्षणिक पात्रता
दिवाणी न्यायाधीशांच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.

वय श्रेणी
दिवाणी न्यायाधीश पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे व जास्तीत जास्त वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे. वयाची मर्यादा 01 जानेवारी 2020 पासून मोजली जाईल.

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 22 सप्टेंबर 2020
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख – 05 नोव्हेंबर 2020
शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख – 05 नोव्हेंबर 2020
ऑनलाइन फॉर्म त्रुटी सुधारणेची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020

अर्ज शुल्क
सर्वसाधारण प्रवर्गाच्या व इतर राज्यातील उमेदवारांना 1122.16 रुपये तर मध्य प्रदेशातील राखीव वर्गाला 722.16 रुपये जमा करावे लागतील. अर्ज फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा कियोस्कद्वारे दिली जाऊ शकते.

अर्ज कसा करावा
जाहीर झालेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार एमपीएससी mphc.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात