Homeताज्या बातम्याSarkari Naukri : आरोग्य विभागात बंपर भरती, मिळणार शानदार पगार, जाणून घ्या...

Sarkari Naukri : आरोग्य विभागात बंपर भरती, मिळणार शानदार पगार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थान आरोग्य विभाग (आरयूएचएस) ने २००० पदांच्या मेडिकल ऑफिसरची भरती काढली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ३० जूनपर्यंत अर्ज करू शकतात. या जागांवर उमेदवारांची थेट भरती केली जाईल. त्यांना फक्त एक संगणक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.

किती वेतन मिळणार?
या २००० पदांसाठी लेव्हल १४ अंतर्गत वेतन दिले जाईल. म्हणजे निवडलेल्या उमेदवारांचे वेतनमान दरमहा १५६००-३९१०० रुपये असेल.

वयोमर्यादा किती आहे?
आरयूएचएस वैद्यकीय अधिकारी भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय २२ ते ४७ वर्षे वयोगटातील असावे. १२.०७.२०२० च्या आधारे वयाची गणना केली जाईल.

पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याची नोंदणी राजस्थान मेडिकल कौन्सिलमध्येही असली पाहिजे.

अर्ज फी
वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ५००० रुपये द्यावे लागतील. तर राजस्थानमधील एससी, एसटी उमेदवारांना २५०० रुपये अर्ज फी द्यावे लागेल.
ruhs_060520120715.jpg

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात – ८ जून २०२०
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३० जून २०२०
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२०
परीक्षेची तारीख – १२ जुलै २०२०

कशी होणार निवड?
आरयूएचएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवड ऑनलाईन चाचणीच्या आधारे केली जाईल. ही चाचणी संगणक आधारित असेल.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News