Sarkari Naukri 2020 : 10 वी पासून MBA पर्यंतच्या उमेदवारांसाठी सरकारी भरती, 3 लाखापर्यंत पगार
पोलीसनामा ऑनलाइन टीम – लाखो रूपये पगाराच्या नोकरीचे स्वप्न पाहणार्या युवकांसाठी उत्तर प्रदेश राज्य वीज उत्पादन निगम लिमिटेडने अनेक पदांसाठी भरती काढली आहे. युपीआरव्हीएनएलने असिस्टंट इंजिनियर, अकाउंट ऑफिसर, सहायक पुनरावलोकन अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ ग्रेड फिटर, तंत्रज्ञ ग्रेड 2 इलेक्ट्रिशियन आणि तंत्रज्ञ ग्रेड 2 च्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. युपीआरव्हीएनएलने एकुण 353 पदांवर भरती काढली आहे.
असिस्टंट इंजिनियरच्या पदासाठी किमान वय मर्यादा 18 वर्ष आहे. तर अन्य पदांसाठी 21 वर्ष आहे. कमाल वय मर्यादा 40 वर्ष ठरवण्यात आली आहे. आरक्षित वर्गासाठी वयात सुट आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 3 लाख रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाईल.
या भरती अंतर्गत योग्य व इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवार 6 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. तर, अर्जाचे शुल्क 8 एप्रिलपर्यंत जमा करता येईल.
अर्ज करणार्या योग्य उमेदवारांना प्रथम एक मुलाखत द्यावी लागेल. ज्यानंतर कम्प्युटर आधारित परीक्षासुद्धा पास व्हावे लागेल. या पदांसाठी अधिकृत वेबसाइट uprvunl.orgवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.
353 पदांसाठी होणार्या भरतीसाठी 10वी पासून डिग्री होल्डर्स सुद्धा अर्ज करू शकतात. यामध्ये असिस्टंट इंजिनियर पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांना इंजिनियरिंगमध्ये 65 टक्केसह पास होणे बंधनकारक आहे.
तर, तंत्रज्ञ ग्रेडच्या भरतीसाठी आयटीआयसह 10वीची परीक्षा पास असणे आवश्य आहे. याशिवाय डिप्लोमा होल्डर्स सुद्धा काही पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी uprvunl.org वेबसाइटवर जाऊ शकता.