12 वी पास, पदवीधरांसाठी नोकरीची संधी; ESIC मध्ये 6552 पदासांठी भरती सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कर्मचारी राज्य विमा निगममध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. ईएसआयसीमध्ये विविध पदाकरिता 6 हजार 552 जागांची भरती केली जाणार आहे. याकरिता मंगळवारपासून (दि. 2) अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 31 मार्च 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये एकूण 6552 पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी 6306 तर स्टेनोग्राफर पदासाठी 246 पदांवर भरती होणार आहे. अधिकृत जाहिरात आणि पदांची संख्या यासाठी esic.nic.in या वेबसाईटवर दिली आहे. स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या सर्व पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.