Sarkari Naukri 2021 : राजस्थानमध्ये 1128 पदांवर भरती, 10 वी पास सुद्धा पात्र

नवी दिल्ली : राजस्थान कर्मचारी निवड आयोगाद्वारे (आरएसएमएसएसबी) 1128 पदांवर होत असलेल्या भरतीसाठी अर्जाची आज शेवटची तारीख आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार आज म्हणजे 7 जानेवारी 2021 पर्यंतच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार sso.rajasthan.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. या भरती अंतर्गत फॉरेस्ट गार्ड (वनरक्षक) आणि फॉरेस्टर ( वनपाल ) च्या 1128 पदांवर उमेदवरांची निवड करण्यात येईल.

पदांची माहिती
फॉरेस्ट गार्ड – 1041 पदे.
फॉरेस्टर – 87 पदे.

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 7 जानेवारी 2021.
अर्ज शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख – 7 जानेवारी 2021.

वेतन
फॉरेस्ट गार्डच्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 4 च्या आधारावर वेतन मिळेल. तर, फॉरेस्टरच्या पदावर निवडण्यात आलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 8 च्या आधारावर वेतन मिळेल.

पात्रता आणि वयोमर्यादा
फॉरेस्ट गार्डच्या पदासाठी उमेदवार 10वी पास असावा. त्यास हिंदी आणि राजस्थानी संस्कृतीविषयी माहिती असावी. या पदासाठी 18 वर्ष ते 24 वर्ष वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.

फॉरेस्टरच्या पदासाठी उमेदवार 12 वी पास असावा. त्यास हिंदी आणि राजस्थानी संस्कृतीविषयी माहिती असावी. या पदासाठी वय 18 ते 40 वर्षाचे उमेदवार अर्ज करू शकतात. दोन्ही पदांसाठी उमेदवारांच्या वयाची मोजणी 1 जानेवारी 2021 पर्यंतच्या वयाच्या आधारावर केली जाईल.

निवड प्रक्रिया
या भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. याशिवाय शारीरिक दक्षता परीक्षा सुद्धा पास व्हावे लागेल. ज्यानंतर मेरिट लिस्टच्या आधारावर उमेदवारांची निवड होईल.

अर्ज शुल्क
सामान्य आणि ईडब्ल्यूएस वर्गासाठी – 450 रुपये.
राजस्थानच्या नॉन क्रीमी लेयर ओबीसी/एमबीसी वर्गासाठी – 350 रुपये.
राजस्थानच्या एससी, एसटी वर्गासाठी – 250 रुपये.