Sarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू शकतात अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना (Corona) महामारीच्या तिसर्‍या लाटेचा विचार करता दिल्ली सरकार (Sarkari Naukri) 5000 आरोग्य कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. ही घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी केली आहे. कम्युनिटी नर्सिंग असिस्टंट (Community Nursing Assistant) किंवा मेडिकल असिस्टंट (Medical Assistant) किंवा हेल्थ असिस्टंटच्या (Health Assistant) पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार delhifightscorona.in वर जाऊन अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना 27 जूनपासून ट्रेनिंग दिले जाईल. sarkari naukri delhi government recruitment 5000 health assistants for fight to covid pandemic

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

केजरीवाल यांनी म्हटले की, सरकारने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत पॅरामेडिकल आणि मेडिकल स्टाफची कमतरता दिसून आली होती. यासाठी आता 5000 हेल्थ असिस्टंटना ट्रेनिंग दिले जाईल. हे ट्रेनिंग 500-500 च्या बॅचमध्ये होईल. यामध्ये नर्सिंग, पॅरामेडिक्स, लाईफ सेव्हिंग, फर्स्ट एड आणि होम केयरचे ट्रेनिंग दिले जाईल. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, उमेदवारांचे दोन आठवड्यांचे ट्रेनिंग गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीत होईल. त्यांना दिल्लीतील 9 प्रमुख वैद्यकीय संस्थांमध्ये मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल.

अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक
https://delhifightscorona.in/paramedical-health-assistant/

नर्स आणि डॉक्टरांना करणार मदत
केजरीवाल यांनी म्हटले की, हेल्थ असिस्टंट नर्से (Nurse) आणि डॉक्टरांना (Doctor) मदत करतील. ते स्वता कोणताही निर्णय घेणार नाहीत. या लोकांना ऑक्सीजन लेव्हल तपासणे, ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेव्हल चेक करणे, सॅम्पल कलेक्शन, ऑक्सीजन सिलेंडर लावणे, ऑक्सीजन कॉन्सट्रेटर सेट करणे यासारख्या बेसिक गोष्टी सांगितल्या जातील. त्यांना आवश्यकतेनुसार, बोलावण्यात येईल. जेवढे दिवस काम करतील तेवढ्या दिवसाचेच मानधन मिळेल. उमेदवारांची निवड अगोदर या, अगोदर मिळवा, आधारावर होईल.

हे उमेदवार करू शकतात अर्ज
हेल्थ असिस्टंट बनण्यासाठी उमेदवार 12वी पास असावा. सोबतच किमान वय 18 वर्ष असावे.

Wab Title :- sarkari naukri delhi government recruitment 5000 health assistants for fight to covid pandemic

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत