AIIMS Recruitment 2020 : एम्समधील ‘सीनियर रेजिडेंट’च्या पदांवर भरती, जाणून घ्या पगार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रायपूरमध्ये विविध विभागांमधील सीनियर रेजिडेंटच्या पदांवर भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत एकूण 142 पदांवर नियुक्ती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 डिसेंबर 2020 पर्यंत iiimsraipur.edu.in या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. जाणून घेऊया या संबंधित महत्त्वाची माहिती

पोस्ट संख्या

सीनियर रेजिडेंट (ग्रुप ए) ची एकूण 142 पदे भरती केली जातील. त्यापैकी 64 पदे सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत. ओबीसीसाठी 35, एसटीसाठी 27 आणि एसटी उमेदवारांसाठी 7 पदे आरक्षित आहेत.

शैक्षणिक पात्रता

एम्समधील सीनियर रेजिडेंट पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून मेडिकलमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वय श्रेणी

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित केली गेली आहे.

अर्ज फी

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांना 1000 रुपये फी भरावी लागेल, तर अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांना 800 रुपये शुल्क भरावे लागेल. दरम्यान, या पदांच्या अर्जाची अंतिम तारीख 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ठेवली आहे.

पगाराची माहिती

एम्स रायपूर भरती 2020 च्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 67,700 रुपये तसेच NPA (लागू असल्यास) यासह सामान्य भत्ता देण्यात येईल.