इंजिनियर्ससाठी सरकारी व्हॅकन्सी, अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या डिटेल्स

BEL Project Engineer Recruitment 2020 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने प्रोजेक्ट इंजिनियर पदावर भरतीसाठी 60 व्हॅकन्सी जारी केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार बीई, बीटेक किंवा बीएससी इंजिनियरिंग असणे जरूरी आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव
प्रोजेक्ट इंजिनियर (मेडिकल डिव्हायसेस)

पदांची संख्या
एकुण 60

वेतन
35,000 रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा
उमेदवार कमाल 28 वर्षांचा असावा. वयाची गणना 1 ऑगस्ट 2020 पासून केली जाईल.

शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ मॅकेनिकल/ इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रूमेंटेशन/ मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स/ मेडिकल इंस्ट्रूमेंटेशनमध्ये बीई, बीटेक, बीएससी इंजिनियरिंग (4 वर्षे)

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्यास प्रारंभ – 12 ऑगस्ट 2020

ऑनलाइन अर्जांची अंतिम तारीख – 26 ऑगस्ट 2020

अर्ज शुल्क
सामान्य/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गाच्या उमेवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी वर्गासाठी अर्ज नि:शुल्क आहे. शुल्काचा भरणा एसबीआय कलेक्टमधून करावा लागेल.

अर्ज आणि निवड प्रक्रिया
बीईएलची वेबसाइट bel-india.in वर जाऊन दिलेल्या निर्देशांनुसार उमेवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवाराची निवड बीई/ बीटेकमध्ये प्राप्त गुण, कामाचा अनुभव आणि व्हिडिओ आधारित इंटरव्ह्यूद्वारे होईल.