BEL Recruitment 2021 : टेक्नीशियनसह अनेक पदांसाठी व्हॅकन्सी, लवकर करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्नीशियनच्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकुण 52 रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येईल. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2021 आहे.

पदांची संख्या
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने बेंगळुरु कॉम्प्लेक्ससाठी ही व्हॅकन्सी काढली आहे. ज्यामध्ये इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी (ईएटी) ची 25 पदे तर टेक्नीशियनच्या 27 पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता
इंजीनियरिंग असिस्टंट ट्रेनी पदासाठी अर्ज करण्यासाठी इंजीनियरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर टेक्नीशियनच्या पदावर अर्ज करण्यासाठी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या पदांवर अर्ज करण्यासाठी कमाल वय 28 वर्ष ठरवण्यात आले आहे. यामध्ये आरक्षित वर्गांना नियमानुसार सूट असेल. तर, वयाची गणना 1 जानेवारी 2021 पासून केली जाईल.

अर्ज शुल्क
बीईएल भरती 2021 साठी जारी नोटिफिकेशननुसार जनरल /ओबीसी / ईडब्ल्यूएस श्रेणीतील संबंधित उमेदवारांना उमेदवारांना 300 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. जर एससी / एसटी वर्गाचे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही.

निवड प्रक्रिया
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या या भरतीसाठी उमेदवारांची निवड परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल.

असा करा अर्ज
बीईएल इंजीनियरिंग असिस्टंट इंजिनियरिंग ट्रेनी आणि टेक्नीशियनच्या पदावर नोकरीसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची अधिकृत वेबसाइट @bel-india.in च्या द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता.