तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! 10 वी च्या टक्केवारीवर मिळणार JOB

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तरुणांना रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. नोकरीच्या शोधात असणारे तरुण रेल्वेत नोकरी करण्यासाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेविना रेल्वेत नोकरी करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे, ही कोरोना काळातील सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरने ट्रेड अप्रेंटिससाठी बंपर रिक्त जागांवर भरती काढली आहे. ज्यासाठी इच्छुक उमेदवार 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

परीक्षा न घेता निवडले जाणार
रेल्वेत 432 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ज्यामध्ये दहावीच्या गुणांच्या आधारावर नोकरी मिळणार आहे. या पदांवर भरती आयटीआय कोर्सच्या गुणांवर आणि दहावीच्या गुणांवर आधारित असेल. दहावी आणि आयटीआयच्या उमेदवरांच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर या नोकरीत उमेदवारांना निवडले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदत
या भरतीसाठी उमेदवारांना 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. उमेदवार अप्रेंटिसशिप इंडिया डॉट कॉमच्या मध्यमातून या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये 164 पदे अनारक्षित आहेत. तर 44 ईडब्ल्यूएस, 120 ओबीसी, 69 एससी, 35 एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत. या भरती विविध ट्रेडसाठी होणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदा संबंधित ट्रेडमध्ये दहावी मार्कशीट व आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे कमाल वय 24 असावे. वय 1 जुलै 2020 पर्यंत ग्राह्य धरलं जाणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 3 वर्षे, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि वेगवेगळ्या अपंग व्यक्तीसाठी 10 वर्षे सवलत देण्यात आली आहे. निवडलेल्या उमेदवारांचे एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले जाईल. छत्तीसगड सरकारच्या नियमांनुसार त्यांना वेतन मिळणार आहे.