Sarkari Naukri : बँकांमध्ये ‘नोकरी’ची सुवर्णसंधी, 9600 हून अधिक जागा, ‘असा’ करा अर्ज

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना संकटाच्या या काळात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या व त्यासाठी तयारी करणार्‍या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेषत: ही बातमी त्या लोकांसाठी अधिक महत्त्वाची आहे जे बँकेत नोकरीची तयारी करीत आहेत किंवा बँकेत नोकरी मिळवू इच्छितात. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने 43 बँकांमध्ये विविध पदांसाठी 9600 रिक्त जागा काढल्या आहेत. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार 21 जुलै 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. बँकांमध्ये पीओ पासून लिपिक पदांवर भरती केली जाणार आहे.

वास्तविक, आयबीपीएस आरआरबी भरती 2020 अंतर्गत देशातील विविध ग्रामीण बँकांसाठी 9638 पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत स्केल 1, 2 आणि 3 चे अधिकारी व कार्यालय सहाय्यकांच्या पदांसाठी भरती केली जाईल.

आयबीपीएस आरआरबी भरती 2020 नुसार जाहीर अधिकृत अधिसूचनेनुसार प्रथम यूपी ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक, सर्व हरियाणा ग्रामीण बँक, राजस्थान मुरुधारा ग्रामीण बँक, मध्यांचल ग्रामीण बँक, मध्य प्रदेश ग्रामीण बँक, हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक, झारखंड राज्य ग्रामीण बँक, बडोदा यूपी बँक, आर्यवर्त बँक लखनऊ, दक्षिण बिहार ग्रामीण बँक पटना बिहार, बडोदा राजस्थान क्षेत्रिय ग्रामीण बँक आणि छत्तीसगड राज्य ग्रामीण बँक अशा अनेक बँकांमध्ये भरती होईल.

अर्जासंबंधित महत्वाची माहिती –

संस्थेचे नाव – आयबीपीएस आरआरबी भरती 2020
पदांची नावे – पीओ ते लिपिक
पदांची संख्या – 9638

वयाची अट –

कार्यालय सहाय्यकासाठी – 18 ते 28 वर्षे
ऑफिसर स्केल (I) – 18 ते 30 वर्षे
ऑफिसर स्केल (II) – 21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल (III) – 21 ते 40 वर्षे

(टीप – राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याची तरतूद)

शैक्षणिक पात्रता –

कार्यालय सहाय्यक – पदवीसह संगणक ज्ञान आवश्यक आहे
ऑफिसर स्केल (I) – पदवीसह संगणक ज्ञान आवश्यक आहे
ऑफिसर स्केल (II) – पदवीत किमान 50% गुण आवश्यक
ऑफिसर स्केल (III) – वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी पदवीमध्ये 50% गुण आवश्यक

अशी होईल निवड – निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

वेतन –

कार्यालय सहाय्यक – दरमहा 7200 ते 19300 रुपये
ऑफिसर स्केल- III (वरिष्ठ व्यवस्थापक) – दरमहा 25700 ते 31500 रुपये
ऑफिसर स्केल- II (व्यवस्थापक) – दरमहा 19400 ते 28100 रुपये
ऑफिसर स्केल -I (असिस्टंट मॅनेजर) – दरमहा 14500 ते 25700 रुपये

अर्ज शुल्क- सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी 850 रुपये आणि एसटी, एससी वर्गातील उमेदवारांसाठी 180 रुपये.

टीप- या रिक्त जागेत विविध पदांवर भरती करण्यात येईल. त्यामुळे सर्व पदांसाठी वेगळी पात्रता, वयोमर्यादा, पगार निश्चित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या रिक्त जागांसंबंधित अधिक माहितीसाठी आयबीपीएस आरआरबी भरती 2020 ची अधिकृत अधिसूचना अवश्य पहा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like