भारतीय लष्करात नोकरीची संधी, 177500 पर्यंत असेल पगार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी- 132) साठी व्हॅकन्सी जारी केली आहे. या अंतर्गत 40 उमेदवारांची भरती करण्यात येईल. या पदांवर ट्रेडनुसार रिक्त पदे निर्धारित केली आहेत. या पदांवर इंजिनियरिंग डिग्री प्राप्त किंवा फायनल ईयरचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. उमेदवार इंडियन आर्मीच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी कमाल वय वर्षे 27 असलेले उमेदवार पात्र असतील. उमेदवारांची निवड मुलाखत आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारावर होईल.

वेबसाइट :  joinindianarmy.nic.in

पदाचे नाव – 132 टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी)

पदांची संख्या- 40

वेतन – 56,100-1,77,500 रुपये

ट्रेडनुसार रिक्त पदे –

1. सिव्हिल- 10

2. आर्किटेक्चर- 01

3. मॅकेनिकल- 03

4. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स- 04

5. कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनियरिंग/कम्प्यूटर टेक्नॉलॉजी/इन्फॉर्मेशन टेक/एमएससी (कम्प्यूटर सायन्स)- 09

6. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/सॅटेलाइट कम्युनिकेशन- 06

7. एरोनॉटिकल/बॅलिस्टिक्स/एव्हियोनिक्स- 02

8. एरोस्पेस- 01

9. न्यूक्लियर टेक्नॉलॉजी- 01

10. ऑटोमोबाईल- 01

11. लेजर टेक्नॉलॉजी- 01

12. इंडस्ट्रियल/मॅन्यूफॅक्चरिंग- 01

एकुण संख्या- 40

शैक्षणिक पात्रता :
संबंधित ट्रेडमध्ये इंजिनियरिंग डिग्री किंवा उमेदवार इंजिनियरिंग डिग्री कोर्सच्या फायनलमध्ये असावा.

वयोमर्यादा :
उमेदवाराचे किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 27 वर्ष असावे. वयाची हिशेब 1 जानेवारी 2021 च्या आधारावर केला जाईल.

अर्ज शुल्क :
या पदांसाठी कोणतेही शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा

* ऑनलाईन अर्ज सुरू : 28 जुलै 2020

* ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2020

अर्ज प्रक्रिया :
या पदांसाठी अर्ज ऑनलाईन भरले जातील. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइटवर जाऊन आणि दिलेले निर्देशांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करतील. अर्ज सबमिट करताना त्याची प्रिंटआऊट पुढील प्रक्रियेसाठी आपल्याकडे ठेवावी.

निवड प्रक्रिया :
योग्य उमेदवारांची निवड पीईटी, एसएसबी इंटरव्ह्यू आणि मेडिकल परीक्षेने केली जाईल.