IOCL Recruitment 2020 : इंडियन ऑईलमध्ये 482 पदांसाठी भरती, 12वी पास सुद्धा करू शकता अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IOCL Recruitment 2020 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) ने 482 पदांवर भरतीसाठी व्हॅकन्सी काढली आहे. या भरती अंतर्गत मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, टेलीकॉम्युनिकेशन अँड इंस्ट्रूमेंटेशन, एचआर, अकाऊंट्स आणि डाटा एंट्री ऑपरेटरच्या पदावर नियुक्ती केली जाईल. आयओसीएलमध्ये अ‍ॅपरेन्टिसच्या पदावर नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट iocl.com वर जाऊन 22 नोव्हेंबर 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 4 नोव्हेंबरपासून सुरू आहे.

पदाचे नाव आणि संख्या
टेक्नीशियन अ‍ॅपरेन्टिस मॅकेनिकल- 145 पदे
टेक्नीशियन अ‍ॅपरेन्टिस इलेक्ट्रिकल- 136 पदे
टेक्नीशियन अ‍ॅपरेन्टिस टेलीकम्यूनिकेशन आणि इंस्ट्रूमेंटेशन- 121 पदे
ट्रेड अ‍ॅपरेन्टिस असिस्टंट ह्यूमन रिसोर्स- 30 पदे
ट्रेड अ‍ॅपरेन्टिस (अकाऊंटंट)- 26 पदे
डाटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर अ‍ॅपरेन्टिस)- 13 पदे
डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर्स)- 11 पदे

शैक्षणिक पात्रता
आयओसीएलमध्ये विविध पदांवर निघालेल्या व्हॅकन्सीसाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा वेगवेगळी ठरवलेली आहे. ज्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदावर 12वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतो.

वयोमर्यादा
या पदांवर अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 24 वर्ष असावे.

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 4 नोव्हेंबर, 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर, 2020

प्रशिक्षण कालावधी
टेक्नीशियन अ‍ॅपरेन्टिस (Elec/Mech/T&I)-1 वर्ष
ट्रेड अ‍ॅपरेन्टिस (Assistant HR/Accountant)-1 वर्ष
डाटा एंट्री ऑपरेटर आणि डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर- 15 महीने

निवड प्रक्रिया
या पदांवर उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारावर केली जाईल. अधिक माहितीसाठी https://iocl.com/PeopleCareers/PDF/Engagement_of_Apprentices_in_Pipelines_Division_30_10_2020.pdf येथे क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता.