इंडियन आर्मी, CISF, रेल्वेसह ‘या’ सरकारी विभागात निघाली मेगा भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाचे थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. तर काही ठिकाणी काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचदरम्यान सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातल्या अनेक राज्यातील अनेक सरकारी विभागात भरती निघाल्या आहेत. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

SSB कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, २७ ऑगस्टपूर्वी अर्ज करा –
एसएसबी कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे विविध विभागांत एकूण १५२२ कॉन्स्टेबल पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२० पूर्वी अर्ज भरावा.

सर्वोच्च न्यायालयात इमारत पर्यवेक्षक भरती, लवकरच अर्ज करा, शेवटची तारीख जवळ आली –
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पात्र भारतीय नागरिकांकडून इमारत पर्यवेक्षकाच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार २९ ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पाठवू शकतात.

ऑफिसर स्केल आणि ऑफिस असिस्टंट परीक्षेची तारीख जाहीर –
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस रिजनल रुरल बँक्स (आरआरबी) मध्ये भरती होणाऱ्या पदांच्या परीक्षेची तारीख १० ऑगस्ट २०२० जाहीर केली आहे. याबाबत आयबीपीएसने अधिकृत शॉर्ट नोटीस पाठवून ही माहिती दिली आहे.

कॅबिनेट सचिवालयात १२ वी पाससाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. जाणून घ्या निवड कशी होईल –
भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयांनी फील्ड असिस्टंटच्या १२ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ईशान्य राज्यातील रहिवासी असलेले असे उमेदवार या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आपला अर्ज विहित नमुन्यात भरावा लागेल आणि अर्ज फॉर्म ३१ ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी सचिवालयात पाठवावा लागणार आहे.

Indian Army मध्ये १२ वी पास सैनिक डी. फार्मा, नर्सिंग सहाय्यक आणि नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीयसाठी पदासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत –

कोटा येथील सैन्य भरती कार्यालयानं सैनिक डी फार्मा आणि सैनिक नर्सिंग सहाय्यक आणि नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार २२-०९-२०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

राजस्थान पोस्टल सर्कल ने ३२६२ जीडीएस पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे – भारतीय टपाल खात्यानं राजस्थान पोस्टल सर्कलच्या जीडीएस पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित केली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत, परंतु अद्याप कोणत्या तरी कारणास्तव या पदांसाठी अर्ज केलेला नाही, ते आता अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.

दक्षिण-पूर्व रेल्वेने अ‍ॅप्रेंटिसपदासाठी मागवले अर्ज, ३० ऑगस्टपूर्वी अर्ज करावा लागणार –
दक्षिण-पूर्व रेल्वेने अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ३० ऑगस्ट २०२० पूर्वी नमूद केलेल्या स्वरूपात अर्ज करावा. एसईसीआरच्या अ‍ॅप्रेंटिसपदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत, जर आपण देखील इच्छुक आणि पात्र असाल तर उशीर करू नका आणि वेळेत विहित नमुन्यात फॉर्म भरा. या भरती मोहिमेद्वारे एकूण 432 पदे भरली जाणार आहेत.

सीआयएसएफ कॉन्स्टेबल/ट्रेडमॅन परीक्षा ६ सप्टेंबरला होणार, नवीन परीक्षेची तारीख जाहीर –
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफने पुन्हा एकदा कॉन्स्टेबल/ट्रेडरमॅन भरती 2019च्या परीक्षेची तारीख रद्द केलेली आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबल / ट्रेडमॅन भर्ती २०१९ लेखी परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार होती. यासंदर्भात नोटीस सीआयएसएफच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत तज्ज्ञ अधिकाऱ्यांची भरती, लेखी परीक्षा नाही –
नॅशनल हाऊसिंग बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी केली आहे. एनएचबी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी २८ ऑगस्टपूर्वी अर्ज करावा.