MPRS Bank Recruitment 2021 : सरकारी बँकेत नोकरी; एक लाखपर्यंत पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला जर बँकेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी आता नवी संधी मिळत आहे. मध्य प्रदेश सहकारी बँकेने कॅडर ऑफिसरच्या पदासाठी 75 जागांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी उमेदवार apexbank.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

सहकारी बँकेत या भरतीअंतर्गत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (CEO), जनरल मॅनेजर (GM), मॅनेजर अकाउंट्स, मॅनेजर ऍडमिनिस्ट्रेशन आणि नोडल ऑफिसर या पदांसाठी 75 जागांची नियुक्ती केली जाणार आहे. Apex Bank च्या नुसार, या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. apexbank.in या लिंकवर क्लिक करून वयोमर्यादा, अर्जाचे शुल्क यासह सर्व आवश्यक बाबींसंबंधी संबंधित माहिती मिळू शकते.

– रजिस्ट्रेशनची सुरुवात – 15/01/2021

– अर्ज करण्याची अखेरची मुदत – 15/02/2021

– फॉर्म प्रिंटिंगची शेवटची तारीख – 1/03/2021

– ऑनलाईन फी पेमेंट – 15/01/2021 ते 15/02/2021

किती मिळेल पगार ?
– सीईओ (GM) : पे स्केल 77,150-1,12,430 रुपये (एकूण मासिक वेतन 1,03,345 रुपये)

– मॅनेजर (अकाउंट्स) – पे स्केल 53,550-90,830 रुपये (एकूण मासिक वेतन 73,205 रुपये)

– मॅनेजर (ऍडमिनिस्ट्रेशन) – पे स्केल 53,550-90,830 रुपये (एकूण मासिक वेतन 73,205)

– नोडल ऑफिसर – पे स्केल 53,550-90,830 (एकूण मासिक वेतन 73,205)