NCL मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, होणार मेगाभरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील चार महिन्यांपासून देशावर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटामध्ये हातावर पोट असलेल्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे. पण या संकटाच्या काळातही अनेक सरकारी विभागात नोकरी दिली जात आहे. पोस्ट ऑफिस, सेबीसारख्या संस्थांनी नोकरीच्या ऑफर दिल्यानंतर आता NCL ने मोठी भरती काढली आहे.

एनसीएल ऑपरेटर भरती 2020 अंतर्गत नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने ऑपरेटर प्रशिक्षणार्थी पदासाठी वेगवेगळ्या विभागामध्ये 307 रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये ड्रॅगलाईन ऑपरेटर, डोजर ऑपरेटर, ग्रेडर ऑपरेटर, डंपर ऑपरेटर आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी दहावी पास आणि विहित पात्रता असलेले 18 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. 17 जुलैपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

दुसरीकडे एनसीएलने अकाऊंटंटसाठी अनेक रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पदांसाठी 93 रिक्त पदं असून या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. या पदासांठी उमेदवार 17 जुलैपासून अर्ज करू शकतात. यासाठी शैक्षणिक पात्रता सर्व पदांसाठी स्वतंत्रपणे विहित आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

बेवसाईटnclcil.in
पोस्ट नाव – ऑपरेटर प्रशिक्षणार्थी
पोस्टची संख्या – 370
वेतन श्रेणी – या पदावर निवडलेल्या उमदेवरांना दररोज 1011.27 रुपये मिळणार आहेत.
रिक्त पदे –
1. ड्रॅगलाइन ऑपरेटर -9
2. डॉजर ऑपरेटर – 48
3. ग्रेडर्स ऑपरेटर – 11
4. डंपर ऑपरेटर – 167
5. शोवेल ऑपरेटर – 28
6. पे लोडर ऑपरेटर – 6
7. क्रेन ऑपरेटर – 21
8. ड्रिल ऑपरेटर – 17

एकूण पदांची संख्या – 307

शैक्षणिक पात्रता – प्रशिक्षणार्थी ऑपरेटर पदावरील व्यक्तीला पात्रतेनुसार वेगवेगळ्या विभागात नोकरी दिली जाईल.
– ड्रॅगलाईन ऑपरेटर – एनसीव्हीटी, एससीव्हीटी ट्रेड प्रमाणपत्र, मॅट्रिक, एसएससी, हायस्कूल किंवा समकक्ष पास आणि डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, फिटर ट्रेड व वैध एसएमव्ही परवाना भारत राज्यातील कोणत्याही आरटीए, आरटीओकडून जारी केलेला.
– ड्रेजर, ग्रेड ऑपरेटर – मॅट्रिक, एसएससी, हायस्कूल किंवा समकक्ष पास आणि कोणत्याही आरटीए, आरटीओकडून वैध एचएमव्ही परवाना
वयोमर्यादा – ऑपरेटर ट्रेनीच्या सर्व व्यवहारांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 असावे. तर जास्तीत जास्त 30 असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. वयोमर्यादा 30 मार्च 2020 च्या आधारे होणार आहे.

अर्ज फी – सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना जाहीर झालेल्या पदासांठी अर्ज करण्यासाठी 500 रुपये जमा करावे लागतील. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईएसएम, विभागीय उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरली जाऊ शकते.

अर्ज प्रक्रिया – ऑपरेटर प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज 17 जुलै 2020 पासून भरण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एनसीएलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी व दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट स्वत:कडे ठेवावी.

निवड प्रक्रिया – पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.
पोस्ट तपशील –
1. अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट टेक ग्रेड-ए -11
2. ओवरसीअर ग्रेड-सी – 35
3. अमीन ग्रेड – डी – 10
4. कनिष्ट केमिस्ट टी अँड एस ग्रेड -डी – 7
5. एकूण संख्या – 93

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार वेगवेगळी
1. अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट टेक ग्रेड-ए – मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा समकक्ष परीक्षा पास, आयसीडब्ल्यू किंवा सीएआयमधून इंटरमीडिएट परीक्षा पास
2. ओवरसीअर ग्रेड-सी – मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि सिव्हील अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा
3. अमीन ग्रेड – डी – मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि अमानत परीक्षा प्रमाणपत्र किंवा आयटीआय, समकक्षांकडील सर्व्हे प्रमाणपत्र.
4. कनिष्ट केमिस्ट टी अँड एस ग्रेड -डी – मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष परिक्षा आणि रसायनशास्त्रासह विज्ञान विषयात पदवी.

वयोमर्यादा – या पदांसाठी किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षे वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 30 मार्च 2020 पासून मोजली जाईल.
अर्ज फी – सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना जाहीर झालेल्या पदासांठी अर्ज करण्यासाठी 500 रुपये जमा करावे लागतील. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईएसएम, विभागीय उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरली जाऊ शकते.
वेतन श्रेणी –
1. अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट टेक ग्रेड-ए – 37063.41 प्रतिमहिना
2. ओवरसीअर ग्रेड-सी – 31852.56 दरमहा
3. अमीन ग्रेड – डी – 29460.30 दरमहा
4. कनिष्ट केमिस्ट टी अँड एस ग्रेड -डी – 29460.30 दरमहा