NHM MP CHO Recruitment 2021 : मध्य प्रदेशात 2850 पदांवर भरती, जाणून घ्या सॅलरी

पोलिसनामा ऑनलाईन – NHM MP CHO Recruitment 2021 : राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम), एमपीने समाज आरोग्य अधिकारी म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) च्या पदांवर भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख वाढवली आहे. आता पात्र आणि इच्छूक उमेदवार 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

पदांची संख्या
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत काढलेल्या या व्हॅकन्सीद्वारे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) ची 2850 पदे भरली जातील.

शैक्षणिक पात्रता
कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) च्या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार बीएससी (नर्सिंग) / पोस्ट बेसिक बी.एससी। (नर्सिंग) असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा
या पदांवर अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे. मात्र, आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल. वयाची गणना 1 फेब्रुवारी 2021 नुसार केली जाईल.

सॅलरीची माहिती
कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 रुपये प्रति महिना सॅलरी दिली जाईल. तर, प्रशिक्षण / इंटर्नशिप कालावधी समाप्त झाल्यानंतर प्रति महिना 15,000 रुपये कामगिरीवर अधारित इन्सेटिव्ह दिला जाईल.

निवड प्रक्रिया
या पदांवर उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. अधिक माहितीसाठी http://www.sams.co.in/Final_Rule_Book_Hindi_CHO_NHM_MP_v4.pdf येथे क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता.