RRB Recruitment 2021 : रेल्वेमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, 680 जागांसाठी परीक्षा न घेता भरती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   RRB Recruitment 2021, Sarkari Naukari Live: रेल्वे भरती मंडळ, पश्चिम रेल्वेने इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये इंटर्नशिपसाठी आमंत्रित करणारी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार एकूण ६८० पदे रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. ५ एप्रिल रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद होईल. अर्जासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेसह इतर माहिती पुढे पहा.

शैक्षणिक पात्रता:

१०+२ प्रणाली अंतर्गत उमेदवारांनी ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उमेदवारांना NTVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित ITI पास होणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

उमेदवारांची वयोमर्यादा १५ ते २० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. फ्रेशर्स पूर्व-IT, MLT यांच्यासाठी २५ वर्ष वयोमर्यादा आहे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय निकषांनुसार जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया:

दहावी आणि ITI परीक्षेत सरासरी गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. फ्रेशर्ससाठी SSLC/ मॅट्रिक उमेद्वारांदकडून मिळवलेल्या सरासरी गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

अर्ज फी:

सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही.