SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! 2000 जागांसाठी भरती, मिळणार शानदार पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरूणांना भारतीय स्टेट बँक (एसबीआय) मध्ये अर्ज करण्याची ही एक उत्तम संधी आहे. एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. आता या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

SBI PO Recruitment : पदांची संख्या
SBI PO Recruitment 2020 अंतर्गत एकूण 2 हजार पदे भरली जातील. यापैकी 200 जागा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

SBI PO Recruitment 2020 ची शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदवीधराची पदवी असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये आहेत किंवा पदवीच्या अंतिम सेमेस्टरमध्ये आहेत त्यांनी या अटीखाली अर्ज करू शकतात. त्यांना जर मुलाखतीसाठी बोलावले गेले असेल तर त्यांना 31 डिसेंबरपर्यंत पदवीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

वय श्रेणी
SBI PO Recruitment अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

निवड कशी होईल ?
या पदांवरील उमेदवारांची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.

पगाराची माहिती
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 23,700 ते 42,020 रुपये पगार मिळेल. याशिवाय डीए, एचआरडी, सीसीए व अन्य भत्तेही देण्यात येतील.

अर्ज कसा करावा
इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2020 आहे.