सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! शिक्षण मंडळात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 जागांवर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी शिक्षण मंडळात नोकरीची सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत कनिष्ठ लिपिक संवर्गाची पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरु शकतील. 266 जागांवर ही भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे.

पदाचे नाव
कनिष्ठ लिपिक

पदांची संख्या – 266
वेतनमान – एस- 6 – 19,900 – 63,200 रुपये

महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख – 16 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 6 ऑक्टोबर 2019

शैक्षणिक पात्रता
1.
मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण
2. मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा आणि इंग्रजी टाइपिंग किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासकीय मंडळ अथवा आयटीआयने घेतलेली टाइपिंगची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा व परिक्षा शुल्क
जनरल प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष कमाल 38 वर्ष – 550 रुपये परिक्षा शुल्क
एसी, एसची उमेदवारांसाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 43 वर्ष – 350 परिक्षा शुल्क

येथे करा अर्ज
उमेदवार www.mahahsscboard.maharashtra.gov.in आणि www.mahapariksha.gov.in या वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. अर्ज केल्यानंतर तुम्ही ऑनलाइन शुल्क भरु शकतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like