आर्थिकमहत्वाच्या बातम्याराष्ट्रीय

Sarkari Pension | वार्षिक 60 हजार पेन्शन देईल मोदी सरकार, वयाच्या 40 पूर्वी करा ‘हे’ एक काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sarkari Pension | आपण आपल्या कमाईतील काही भाग आपल्या भविष्यासाठी वाचवतो, जेणेकरून वृद्धापकाळात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये. नोकरीदरम्यानच, आपण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी प्लॅनिंग करू शकतो. लोकांचे भविष्य लक्षात घेऊन सरकार एक योजना देखील चालवते, जिचे नाव आहे अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana (APY), तुम्ही त्यात गुंतवणूक करून एक हजार ते पाच हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळवू शकता. या सरकारी पेन्शन (Pension) योजनेत सेवानिवृत्ती निधीसाठी पैसे जमा करावे लागतात. (Sarkari Pension)

 

योजनेत कोण होऊ शकतो सामील ?

अटल पेन्शन योजना (APY) 18 ते 40 वयोगटातील लोकांसाठी आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही, कारण त्यात 20 वर्षांसाठी निश्चित रक्कम गुंतवावी लागेल.

तरच तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनचा लाभ मिळेल. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले जाऊ शकते किंवा तुमचे आधीच खाते असल्यास, तरीही तुम्ही या योजनेत सामील होऊ शकता. (Sarkari Pension)

 

5000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी करा इतकी गुंतवणूक

जर तुमचे वय 18 वर्षे असेल आणि तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी 5000 रुपये दरमहा पेन्शन हवी असेल, तर प्रत्येक महिन्याला 210 रुपये या योजनेत गुंतवावे लागतील. तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शन हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला दरमहा 42 रुपये जमा करावे लागतील. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवलेले पैसे बुडत नाहीत.

 

कसे मिळतील पैसे ?

काही विशिष्ट स्थितीत, तुम्ही वयाच्या 60 वर्षापूर्वी या योजनेतून पैसे काढू शकता. जर पतीचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर पत्नीला पेन्शनची सुविधा मिळेल. जर पती – पत्नी दोघांचाही 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला, तर नॉमिनीला जमा केलेली रक्कम मिळेल.

 

कर सवलत

अटल पेन्शन योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
या योजनेत पैसे जमा करण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही सुविधा उपलब्ध आहेत.
तसेच ऑटो-डेबिट सुविधा देखील उपलब्ध आहेत. योजनेची प्रीमियम रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप कापली जाईल.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून तुम्ही पेन्शन मिळवण्यासोबतच कर वाचवू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. ही सूट प्राप्तीकर कलम 80सी अंतर्गत उपलब्ध आहे. 2021 – 22 या आर्थिक वर्षात सुमारे 71 लाख लोक या योजनेत सामील झाले होते.

 

Web Title :- Sarkari Pension | invest 210 rupees per month in atal pension yojana and get 5000 pension per month

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button