भाजपनं उमेदवारीवरून नाकारलेल्या ‘या’ 3 उमेदवारांना राष्ट्रवादीनं घेतलं पदरात, दिलं तिकीट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये विधानसभेच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. तेवढ्याच प्रमाणात भाजपला फटका बसताना दिसत आहे. मावळ मतदारसंघातून भाजपकडून इच्छूक असलेले सुनिल शेळके यांना डावलून भाजपने पुन्हा बाळा भेगडे यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने सुनिल शेळके यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना मावळची उमेदवारी दिली. तसेच नाशिक देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे या इच्छूक विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होत्या. पण युतीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा सेनेला गेल्यानं आहिरे यांनी बंड केले. सरोज आहिरे यांना देखील राष्ट्रवादीने पक्षात घेऊन उमेदवारी दिली. तर फलटणमधून उमेदवारी जाहीर केलेल्या भाजपच्या उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीने माळशिरसमधून उमेदवारी दिली आहे.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याने विद्यमान आमदार आणि इच्छूकांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे पक्षामध्ये बंडखोरी वाढत असून याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रस पक्षाकडून घेतला जात आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्याता असल्याने बंडोपंतांना शांत करण्याचे आव्हान भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर आहे. दरम्यान, भाजपने उत्तम जानकर यांना फलटण विधानसभा मतदारसंघातून तयारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राष्ट्रवादीने उत्तम जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून तिकीट देऊन विजयसिंह मोहिते पाटील यांना आव्हान दिले आहे.

नाशिक देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे या इच्छूक विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होत्या. पण युतीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा सेनेला गेल्यानं आहिरे यांनी बंडाचे निशाण फडकवले. भाजपने उमेदवारी नाकारल्याने सरोज यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सरोज आहिरे या भाजपच्या विद्यमान नगरसेवका असून त्या राष्ट्रवादीच्या नाशिक देवळालीमधून उमेदवार असणार आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात सेना-भाजप संघर्ष सुरू असतांना राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न केल्यानं सस्पेन्स कायम आहे.

भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये बंडखोरांचा भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुण्यात मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले असले तरी नाशिकमध्ये मात्र विद्यमान आमदारांनी बंडाचे निशाण उपसले आहे. नाशिकमध्ये भाजपच्या 14 नगरसेवकांनी राजीनामा दिला. नाशिक पूर्व मतदारसंघातले विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. सानप यांचे उमेदवारी नसल्याने त्यांच्या समर्थकांनी दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

isit : Policenama.com