श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं ‘कोरियोग्राफर’ सरोज खान हॉस्पिटलमध्ये दाखल, झाली ‘कोरोना’ टेस्ट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   2020 हे साल बॉलिवूडसाठी खूपच कठिण ठरताना दिसत आहे. बॉलिवूड चाहत्यांसाठी पुन्हा एकदा चिंतीत करणारी बातमी समोर आली आहे. वेटरन कोरियोग्राफर सरोज खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरोज खानला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्यानं त्यांना बांद्र्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सरोज खानला कोरोना ?

सध्या अख्ख जग कोरोनासोबत लढत आहे. अशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरोज खानला कोरोना झालेला नाही. खास बात म्हणजे सूत्रांनी असा दावा केला आहे की, सरोज खान निरोगी आहेत. लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळू शकते. चाहत्यांसाठी नक्कीच ही दिलासादायक बाब आहे.

https://www.instagram.com/p/B_z-9XDpuf6/?utm_source=ig_embed

सरोज खानच्या जवळच्या सूत्रानं खुलासा केलाय की, काही दिवसांपूर्वी त्यांना श्वार घेण्यास तक्रार जाणवत होती. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आम्ही चिंतीत होतो. देवाचे आभार की त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. आता त्यांना तंदुरुस्त वाटत आहे आणि उद्याच त्यांना सुट्टी मिळू शकते.