धक्कादायक ! आधारकार्ड देण्यासाठी सरपंचाकडून महिलेकडे ‘सेक्स’ची मागणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आधार कार्ड बनवून देण्याचे आश्वासन देऊन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सरपंचाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारी ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सरपंच शैलेश राऊत याला बेदम मारहाण केली. हा प्रकार रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावात घडला.

काचुरवाही गावात राहणाऱ्या एका महिलेचे आणि तिच्या पतीचे भांडण सुरु होते. शैलेश हा त्यांच्या ओळखीचा असल्याने त्याने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा बहाणा करत महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला आधार कार्ड आणि रेशन कार्ड बनवून घेण्याचा सल्ला दिला. तू जर आधार कार्ड काढले तर पतीच्या संपत्तीचा आर्धा वाटा तूला मिळेल असे तिला सांगितले. त्यासाठी मी सांगेन तसे तूला वागावे लागेल असे सांगितले.

तसेच नवऱ्याच्या फोनवरून फोन करत जाऊ नकोस. आधार कार्ड काढून देण्यासाठी मी तूला पैसे देतो. त्याचे हे बोलणे व्हायरल झाल्यावर संतप्त ग्रामस्थांनी त्याला चोप दिला. तसेच त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचे सरपंच पदही जाण्याची शक्यता आहे.

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव