सरपंचाची निवड ग्रामपंचायती मधूनच, विधानसभेत आवाजी मतदानानं विधेयक मंजूर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. त्यानंतर आज विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल होणार आहे.