सरपंच, चार सदस्य अपात्र अतिक्रमण भोवले : जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – गावात अतिक्रमण केल्यामुळे इसळक ग्रामपंचायतीचे सरपंच व इतर चार सदस्यांचे सदस्य अशा एकूण पाच जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये सरपंच रावसाहेब गेरंगे, पद्मा रावसाहेब जाधव, छाया संपत गीढे, गयाबाई संजय खामकर, रखमाबाई सोन्याबापु आंधळे यांचा समावेश आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, ऑगस्ट 2015 मध्ये इसळक ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. रावसाहेब गेरंगे यांच्या गटाने एकहाती सत्ता स्थापन केली. मात्र, माजी सरपंच संजय गेरंगे यांनी या निवडीला आव्हान देत संबंधित सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची मागणी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांनी ही तक्रार फेटाळून लावली होती. त्यानंतर संजय गेरंगे व सुरेश गाढे यांनी अप्पर आयुक्त नाशिक विभागात अपील दाखल केले.

फेरचौकशीनंतर मात्र जिल्हाधिकायांनी सरपंचासह इतर चारही ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. तत्पूर्वीच विभागीय आयुक्त नाशक यांन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार सरपंच रावसाहेब नाथा गेरंगे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी अपात्र ठरवले आहे. असा २९ ऑक्टोबर २०१८ रोजी निकाल दिलेला आहे. संजय गेरंगे, सुरेश गाढे आदी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे.

सरकार दरबारी अतिक्रमण केले असल्याचे सिद्ध करताना नाकीनऊ आले. दीर्घ लढा दिला उशिराने का पण न्याय मिळाला आहे, असे माजी सरपंच गेरंगे म्हणाले.