मी पुन्हा येईन ! ‘पायउतार’ झालेल्या सरपंचानं सांगितलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 व्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात ‘मी पुन्हा येईन’ असा डायलॉग मारला होता. त्यानंतर अनेकदा त्यांनी या वाक्याचा पुर्नउच्चार देखील केला. मात्र त्यांचा आता हा डॉयलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला असून लोक रोजच्या व्यवहारातही हा वाक्याचा वापर करू लागले आहेत.

नागपूरच्या कुही तालुक्यातील मांढळ गावचे सरपंच शाहू कुलसंगे यांना सहा महिन्यांपेक्षा ग्रामपंचायतीमध्ये सतत गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेचे प्रशासक संजय यादव यांनी सरपंचपदावरून पायउतार केले. मात्र त्यांनी उच्च न्यायालयात न्यायासाठी प्रकरण दाखल केले व त्यांना या प्रकरणी स्थगिती मिळाली. त्यामुळे ते सरपंचपदी ‘मी पुन्हा येईल’ असं म्हणत आहेत.

सरपंच शाहू कुलसंगे सहा महिन्यांपेक्षा ग्रामपंचायतीमध्ये सतत गैरहजर राहिले. त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार चौकशीसाठी प्रकरण जिल्हा परिषदेकडे आले. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व प्रशासक संजय यादव यांनी सरपंच शाहू कुलसंगे यांना त्याची बाजू मांडण्याकरिता 15ऑगस्ट, 12 सप्टेंबर, 24 सप्टेंबर, 3 ऑक्‍टोबर, 15 ऑक्‍टोबर तसेच 19 नोव्हेंबरला सुनावणीकरीता बोलाविले होते. 3 ऑक्‍टोबर व 19 नोव्हेंबरला झालेल्या चौकशी व सुनावणीत सरपंच कुलसंगे गैरहजर होते.

त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 40/1-ब नुसार त्यांना सरपंचपदावरून रिक्त करीत असल्याचा आदेश फर्मावला. या आदेशाला कुलसुंगे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले तसेच 19 नोव्हेंबरला याप्रकरणी आपले लेखी निवेदन सादर केले. त्यात सरपंच शाहू कुलसंगे यांनी उच्च रक्तदाब असल्यामुळे पक्षघातासारखा आजार झाल्याचे कारण नमूद केले. त्यांनी सुट्टीवर जात असल्याचे पं. स. कुहीच्या सभापतींना पत्राद्वारे कळविले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी या आदेशाला स्थगिती मिळाली आहे.

Visit : Policenama.com
उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे